Saturday, April 25, 2009

Just Married



काल एका टिपिकल लग्नाला गेलो होतो. सगळीकडे प्रचंड लगबग,उंची साड्या,मेकप्स,अत्तराचे भापकारे,भारंभार दगिनें. हे मुलीकडले हे मुलाकडले ,मग त्यांचे मानपान. सगळा अगदी टिपिकल माहोल! "अरे बाळा,केवढा मोठा जॅलास!! मागच्या वेळी एवढासा होतास."किती वेळा तेच संवाद! "ह्याचा मुलगा काय करतो , त्याची मुलगी कोणाबरोबर पळून गेली..." छापाच्या चांभार-चौकशा.. प्रत्येकाचा चेहररयावर ठेवणीतला मिठास हसु... समोर गोड गोड पण पाठ वळलीकी कुजके! हे सगळे पाहत असताना मला 'त्या' लग्नाची आठवण ज़ाली...2महिन्या पुर्वीची गॉशअसेल. आत्ता तुडुंब भरून वहात असलेला हाच हॉल होता तेव्हासुद्धा !
त्यांचे लव-मॅरेज होते. दोघांचाही घरच्या प्रचंड विरोधाला न जुमानता दोघांनी लग्नाचा घाट घातला होता. सगळ्यांनी पाठ फिरवलेली. तिच्या धाकटया बहीनीचा अपवाद वगळता लग्नात एकही नातेवाईक नाही! अगदी सख्खे आई वडील सुद्धा नाहीत!
विचार करत असाल की मग लग्नाला आलेला तरी कोण? तिथेच तर सगळी मजा आहे! त्या लग्नाचा साक्षीदार होता दोघांचा मित्र कंपू! सगळे मिळून 14-15 फक्त!अरे पण केवढे चैतन्न्य होते त्या छोटेखानी समारंभात..जोक्स,दंगामस्ती,चिडवाचिडवी आणि थुइथुइ नाचणारी हास्याची कारंजी..परत ग्रूप मधली जोडपी , त्यांची खेचाखेच , रूसवे फूगवे.. वाटत होते की लग्नाला नाही तर जणू कॉलेज चा कट्यावर परत आलोय.
वधूवर पंक्तीला बसले. अरे पण वाढपी कुथेआहेत ? केटरिंग वाल्याची मोजून दोन माणसे हजर.फिकीर कोण करतो.. हीच सगळी मित्रमैत्रींणिंची फौज कामाला लागली. कोणी मुलाला एकवर एक गुलाबजाम भरवतोय,तर कोणी मुलीचा डोळ्यातून पाणी येइस्तोवर जिलेबी खिलवतेय.
..."याच्या कडून घास घेतलास.. आता माज़या कडून एक... चल आता त्याचाकडून एक.. शेवटचा एक.. नंतर आम्ही थोडीच कधी भरवणार आहोत.. हा हहहा!!"
दोघे बिचारे खाउन खाउन बेजार!!
नातेवाईकांची वर्दळ नाही,महागड्या साड्या नाहीत, अत्तराचे भापकारे नाहीत की मोट्तली रुखवते नाहीत. त्यांचाकडे होते फक्त प्रेम, परस्परंवर विश्वास आणि मित्रांची अतूट साथ.
अचानक ते गाणे आठवले. "यारो..दोस्ती .. बडीही अजीब हेई.. ये ना हो तो क्या..फिर.. बोलो..ये जिंदगी हेई "क्षणभर डोळे पाणावले. पटकन दोघांना शुभेच्छा देऊन निघालो.
खाली आलो आणि पाहतो तर काय.. मित्रमंडळी प्रेमाने वधूवारांची गाडी सजवत होते.
कुठली??? भरजरी साजवलेली आलिशान होंडा सिटी??
नाही...तर त्यांचीच, रोजचाच वापरातली, पण मस्तपैकी फुलांनी माधवलेली होंडा आक्टिवआ !!
लाल गुलाबाची टपोरी फुले,गुलाबी रिबीन्स,हार्ट्स, नि काय काय..
आणि मागे एक हार्ट शेपचा गुलाबी बोर्ड लटकत होता
.
.
.
.
"जस्ट मॅरीड"